हिवाळ्यात कोंबड्यांची काळजी कशी घ्यावी – डॉ. लिना धोटे , डॉ. निलेश पानसरे

बदलत्या वातावरणामुळे जनावरांवर त्याचा काही प्रमाणात चांगला व वाईट परिणाम होतो. थंडी चा काळ हा जनावरांसाठी अतीशय महत्वाचा आहे, त्यात कोंबड्याची  काळजी घेणे अतिशय महत्त्वाची बाब आहे, कारण त्यांच्या शरीराचे तापमान बाकीच्या जनावरांच्या तुलनेत थोडे जास्त असते त्यामुळे थंडी च्या काळात त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. या काळात कोंबड्याच्या शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त उर्जायुक्त खाद्य पुरवावे.या काळात काळजी न घेतल्यामुळे त्यांची प्रजनन क्षमता,अंडी उबवणी क्षमता,अंडी उत्पादन,पाणी पिण्याची क्षमता अश्या अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे कमी तापमानाच्या काळात त्यांच्या आहाराकडे आणि शेडमधील व्यवस्थापणाकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे.

आहार व्यवस्थापन

१. कोंबड्यांना संतुलित आहार पुरवावे जेणेकरून त्यांची रोगप्रतिकार क्षमता उत्तम राहील.
२. शेडमध्ये फीडर्स संख्या वाढवावी.दिवसभर त्यांना मुबलक खाद्य मिळेल याची नोंद घ्यावी.
३. शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी कोंबड्याना उत्तम दर्जाचे खाद्य देने आवश्यक आहे.
४. कमी तापमानाच्या काळात कोंबड्यानं जास्त प्रमाणात खाद्य द्यावे आणि यावेळी त्यांना ऑक्सिजनची मागणीदेखील जास्त असते.
५. खाद्य बनवताना ऊर्जा असणाऱ्या स्रोतांचा प्रामुख्याने स्निग्ध पदार्थांचा वापर करावा.
६. हिवाळ्यामध्ये कोंबड्या खुप कमी पाणी पितात.कोंबड्याना ताज्या व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा.
७. पाणी खुप थंड असेल तर गरम पाणी मिसळून घ्यावे.त्यामुळे त्यांची पाणी पिण्याची क्षमता वाढेल.
८.एकूण वाटरर्स पैकी काही वाटरर्स मध्ये चव येण्याकरिता ग्लुकोज,साखर, टरबुज- खरबूज च पाणी टाकावे जेणेकरून कोंबड्या पाणी पिणार आणि त्यांची पचनक्रिया अगदी सुरळीत राहील.

शेडचे व्यवस्थापन

१. व्यवस्थापन मध्ये अचानक कुठलंही बदल करू नये.
२. शेडची दिशा पूर्व-पश्चिम असावी त्यामुळे जास्तीत जास्त सूर्यप्रकाश शेडमध्ये येण्यास मदत होते.
३. हिवाळ्यात रात्रीच्या वेळेस तापमान खुप कमी होते,त्यामुळे शेडच्या ज्या भागातून थंड हवा येते अश्या ठिकाणची पूर्ण जागा पडद्यानि बंद करून घ्यावेत आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी उघडून घ्यावेत जेनेकरून  सकाळी सुर्यप्रकशाची किरण शेडमध्ये येतील नि कोंबड्याना उब मिळेल.
४. शेडमध्ये चांगल्याप्रकारचे लिटर वापरावे ते नेहमी स्वच्छ व कोरडे असावे लिटर मटेरियल पासून सुद्या कोंबड्याना उब मिळते.
५. शेडमधील हवा खेळती राहण्यासाठी भिंती कमी उंचीच्या व वर जाळी बसवलेली असावी. 
६. प्रदूषित हवा बाहेर फेकण्यासाठी एक्झॅस्ट फॅनची व्यवस्था करावी.
७. शेडभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. बदलत्या हवामानानुसार व्यवस्थापनामध्ये योग्य ते बदल करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
८. शेडमधील हवा खेळती नसेल तर कोंबड्यांचा विष्टेतुन तयार होणाऱ्या अमोनिया वायूमुळे श्वसन विषयी समस्या तयार होतात.त्यामुळे कोंबड्याना ताप येणे,खोकलने,छातीत दुखणे,श्वसनास त्रास होणे,तोंड पसरून श्वास घेणे,भूक मंदावणे,घरघर असा आवाज येणे अश्या बऱ्याच समस्या उद्भवतात.

लेखक:-
डॉ. लिना धोटे , डॉ. निलेश पानसरे
पशुवैद्यक महाविद्यालय, बिदर, कर्नाटक.

About The Author : Author Dr. Lina Dhote is an assistant professor with Bidar veterinary college, KVAFSU You can reach her through Linkdin at https://in.linkedin.com/in/lina-dhote-1020b2134

Disclaimer : This article is shared by Author with “Green Ecosystem” voluntarily, free of cost and for the purpose to be shared with everyone for free and Green Ecosystem doesn’t own / reserve any rights of this article, all rights remains with the author (as mentioned above) of this article. Contact info@blog-greenecosystem-in.mwpsites-a.netwith title of this article if any change.

Leave a Comment